खड्ड्यांची प्रभागनिहाय माहिती द्या
खड्ड्यांची प्रभागनिहाय माहिती द्या
भाजप नगरसेवकाची महापालिकेकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : ‘खड्ड्यांची माहिती लपवून मुंबई महापालिका पावसाळी कामांमधील अपयश लपवण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणण्यासाठी लाइव्ह डॅशबोर्डद्वारे रिअल टाइम खड्ड्यांची प्रभागनिहाय माहिती (डेटा) उपलब्ध करून द्यावा,’ अशी मागणी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्यांचा मागोवा घेण्यासाठी पालिकेने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ ॲप सुरू केल्यानंतर कुलाब्याचे माजी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिकेवर जनतेला रिअल टाइम खड्ड्यांची माहिती प्रदर्शित न केल्याबद्दल टीका केली आहे. नार्वेकर यांनी लाइव्ह डॅशबोर्डद्वारे नागरिकांना हा डेटा उपलब्ध करून देण्याची मागणी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. नार्वेकर यांनी सांगितले, ‘कुलाब्यातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर खड्डे असून पालिकेच्या दुर्लक्षाचे एक ज्वलंत उदाहरण आहे. पालिका पुरेसे रस्तेकाम करण्यात अपयशी ठरल्याने दक्षिण मुंबईतील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. माहिती लपवून ठेवून पालिका जाणीवपूर्वक जबाबदारीपेक्षा अपारदर्शकतेस पसंती देत असल्याचे दिसून येते. तीच अवस्था मुंबईच्या शहर आणि उपनगरांची आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

