वृद्ध रिक्षाचालकाची गळफासाने आत्महत्या

वृद्ध रिक्षाचालकाची गळफासाने आत्महत्या

Published on

वृद्ध रिक्षाचालकाची गळफासाने आत्महत्या
कुटुंबीयांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः डोंबिवली पश्चिमेतील एका रिक्षाचालकाच्या रिक्षाची चारचाकी गाडीला धडक बसली. यामुळे रिक्षाचालक आणि वाहनचालक यांच्यात वाद झाला. गाडीच्या डागडुजीसाठी पैशांची मागणी करीत त्यांना बसवून ठेवले, तसेच त्यांची रिक्षादेखील ठेवून घेतली. या तणावातून रिक्षाचालकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप मृत रिक्षाचालकाच्या कुटुंबाने केला आहे.
मुंजाजी शेळके (वय ६८) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. पीडित कुटुंबासह परिसरातील रिक्षाचालक, रहिवासी विष्णूनगर पोलिस ठाण्यात सकाळपासून जमले होते. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले, की संबंधित चारचाकीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्या मार्गावरील सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील तपास करीत आहोत.
अपघातानंतर वाहनचालकाने केलेल्या दमदाटीमुळे मुंजाजी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मोठा गाव परिसरातून रिक्षा जात असताना रिक्षाचालक मुंजाजी यांच्या रिक्षाची एका चारचाकी गाडीला धडक बसली. यातून वाहनचालक आणि रिक्षाचालक यांच्यात वाद झाला. वाहनचालकाने रिक्षाचालकाला मारहाण केली आणि त्याला रिक्षासह आपल्या घरी नेऊन डांबून ठेवले होते. यानंतर गाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ते पैसे आण आणि रिक्षा घेऊन जा, असे सांगत त्याला सोडून दिले. यानंतर मुंजाजी यांनी घडलेला सगळा प्रकार घरी मुलाला आणि सुनेला सांगितला. एवढे पैसे आणायचे कोठून या तणावातून त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली, असे कुटुंबीयांनी सांगितले. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com