भिवंडीची विकासाकडे वाटचाल

भिवंडीची विकासाकडे वाटचाल

Published on

भिवंडी, ता.२५ (वार्ताहर) ः भिवंडी लोकसभा क्षेत्रात सत्ताधारी खासदारांना दहा वर्षात जमले नाही, त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. खासदारीच्या वर्षपूर्तीनिमित्त भिवंडीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भिवंडीकरांसाठी दळणवळणाची जलद सोय उपलब्ध व्हावी, यासाठी वसई दिवा रेल्वे मार्गावर भिवंडी ते दिवा दरम्यान रेल्वे सेवा वाढवावी तसेच लांब पल्ल्यांच्या या मार्गावरील गाड्यांना भिवंडी रोड रेल्वे स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली. मुरबाड रेल्वे मार्गाचा तत्कालीन खासदारांनी पाठपुरावा केला नव्हता. पण हे काम प्रगतिपथावर पुढे सरकले आहे. शहापूरचा पाणीप्रश्न गंभीर आहे. भावली प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव निधीसह मंजुरी दिली. पण जलशुद्धीकरण प्रकल्प बनवला नाही. ठेकेदारांना जलवाहिनी टाकण्यात तसेच श्रेय घेणाऱ्यांना ठेकेदाराची देयकांना मंजुरीतून टक्केवारी घेण्यात स्वारस्य आहे. महसूल मंत्र्यांकडे जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव पडून होता. त्याचा पाठपुरावा केल्याने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. भिवंडी शहरातील वऱ्हाळ तलाव सुशोभीकरण कामासाठी केंद्राने ५३ कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला पण ४० टक्के हिस्सा राज्य शासनाकडून मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत
------------------------------
केलेल्या कामांचा पाढा
- महामार्ग व राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या हा कळीचा मुद्दा आहे. त्याच्या सोडवणुकीसाठी शासन यंत्रणा व पोलिस प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य मिळत नाही. पाच वेळा बैठका घेऊन उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत.
-भिवंडी-ठाणे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाचे त्रयस्थ संस्थेकडून तपासणी होऊन त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. तसेच भिवंडी-वज्रेश्वरी दरम्यान महापे येथे वळण रस्ता दिल्यास लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो, यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी निधी मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com