कुत्र्याला वाचविताना कार पुलावरून नाल्यात

कुत्र्याला वाचविताना कार पुलावरून नाल्यात

Published on

कुत्र्याला वाचविताना कार पुलावरून नाल्यात
प्रसंगावधानामुळे चालक वाचला

नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) : कुत्र्याला वाचविताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून नाल्यात कोसळल्याची घटना वसई पश्चिम सनसिटी घास रोडवरील तुळजाभवानी माता मंदिराजवळ बुधवारी (ता. २५) पहाटे साडेचार वाजता घडली. कारचा चालक प्रसंगावधान राखून कारच्या काचा फोडून बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला.
वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळावर पोहोचून नाल्यात पडलेली कार बाहेर काढली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कारचे नुकसान झाले आहे. वसई सनसिटी घास रोड हा रात्रीच्या वेळी सुनसान असतो. रस्त्यावर वाहने नसल्याने कारचालक सुसाट जात असताना अचानक समोर कुत्रा आला. त्याला वाचविताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार बाजूच्या पुलाला धडकून थेट नाल्यात कोसळली. वाचविण्यासाठी कोणीही नसताना चालकाने धाडस करून काराच्या काचा फोडल्या आणि तो बाहेर आला. याची माहिती माणिकपूर पोलिसांना कळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून दोन तासांत कार बाहेर काढण्यात यश मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com