आश्वासन दिल्याप्रमाणे आम्हाला वेळ द्या!

आश्वासन दिल्याप्रमाणे आम्हाला वेळ द्या!

Published on

आश्वासन दिल्याप्रमाणे आम्हाला वेळ द्या!
मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः केडीएमसी हद्दीतील रेरा घोटाळ्यातील ६५ बेकायदा इमारतीत राहणारी अनेक कुटुंबे बेघर होणार असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नागरिकांना बेघर होऊ देणार नाही, असे सांगितले होते. त्याची आठवण करून देत नागरिकांना वेळ द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागात रेरा घोटाळ्यातील ६५ बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. याप्रकरणी खऱ्या दोषींवर कारवाई न करता किरकोळ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुख्य विकसक आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेघर होणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नासाठी वेळ न दिल्यास लवकरच मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आला आहे. दीपेश म्हात्रे यांनी म्हटले आहे, की या प्रकरणातील खरी गुन्हेगार मंडळी म्हणजे विकसक आणि बनावट रेरा दस्तऐवज बनवणारे आहेत; मात्र प्रशासनाने प्लंबर, फिटर, मिस्त्री आणि अन्य कामगारांवर गुन्हे दाखल केले आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. हे बिल्डर मोकाट फिरत आहेत आणि त्यांच्यावर कुणा राजकीय पक्षाचा वरदहस्त आहे का, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. या ६५ इमारतींमध्ये सुमारे साडेसहा हजार रहिवासी वास्तव्यास असून त्यांना ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com