तलाव क्षेत्राकडे पावसाची पाठ तलाव क्षेत्राकडे पावसाची पाठ
तलाव क्षेत्राकडे पावसाची पाठ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू होता; मात्र आता तलाव क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
उपनगरांतील तलावांकडे बुधावारी (ता. २५) पावसाने पाठ फिरवल्याचे दिसून आले. अप्पर वैतरणा २७ मि.मी., मोडकसागर १५ मि.मी., तानसा ७ मि.मी., मध्य वैतरणा भातसा २७ मि.मी. आणि भातसा २ मि.मी. असा तुरळक पाऊस पडला. मुंबईतही पावसाने उघडीप घेतली आहे. तशी तलाव क्षेत्रातूनही पाऊस कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसाने तलावांमध्ये जलसाठ्याची पातळी वाढत होती; मात्र आता पाऊस कमी झाल्याने जलसाठ्यात घट होऊ शकतो. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची गरज असते. त्यामुळे मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागत नाही; मात्र जर पाणीसाठा कमी असेल तर मुंबईकरांवर किमान पाच टक्के ते २० टक्के इतक्या पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे तलाव क्षेत्रात अजून पावसाची गरज आहे. सध्या सर्व तलावांमध्ये मिळून पाच लाख सहा हजार ८९० दशलक्ष लिटर जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली.
दोन महिने पावसाचे
जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने जोरदार पावसाचे आहेत. त्यामुळे अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. या अपेक्षित पावसामुळे मुंबईला पाणी पुरविणारे सर्व तलाव भरतील, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, अशी माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

