आणीबाणीतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
आणीबाणीतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
पालघर, ता. २५ (बातमीदार) ः आणीबाणी कालावधीमधील संकलित करण्यात आलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉ. हेमंत सवरा आणि जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले.
छायाचित्राचे हे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन नागरिकांसाठी एक महिना खुले राहणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आणीबाणी कालावधीतील छायाचित्र प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे. शिवाय, जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये आणीबाणी कालावधीमधील लघुचित्रफितीचे प्रसारण करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

