कर्नाक पूल तीन दिवसानंतर खुला होणार

कर्नाक पूल तीन दिवसानंतर खुला होणार

Published on

कर्नाक पुलाला अखेर मुहूर्त
तीन दिवसांत खुला करण्याचे पालिकेचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः मशीद बंदर रेल्वेस्थानकापासून काही अंतरावरील आणि पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मार्गरेषा, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलकांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत हा पूल मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. १२५ वर्षे जुना हा पूल धोकादायक झाल्‍याने मध्य रेल्वेने ऑगस्‍ट २०२२मध्‍ये हा पूल पाडला. त्यानंतर पालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. मध्‍य रेल्‍वेने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम करण्‍यात आले. सद्य:स्थितीत सर्व कामे पूर्ण झाली असून, पूल वाहतुकीसाठी सज्ज आहे. येत्या दोन-तीन दिवसांत हा पूल सेवेत आणण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
---
लोहमार्गावर दोन तुळया
कर्नाक पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून, रेल्वेच्या हद्दीत पुलाची लांबी ७० मीटर आहे. महापालिका ह‌द्दीतील पोहोच रस्‍त्‍याची एकूण लांबी २३० मीटर आहे. लोहमार्गावरील पुलाच्‍या उभारणीसाठी सिमेंट खांबावर प्रत्येकी ५५० टन वजनाचे ७० मीटर लांब, २६.५० मीटर रुंद आणि १०.८ मीटर उंचीच्‍या दोन तुळया बसवण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com