वाशीतील लेडीज बारवर कारवाई
वाशीतील लेडीज बारवर कारवाई
चार बारबालांसह सात जण ताब्यात
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : वाशी पोलिसांनी सोमवारी (ता. २३) मध्यरात्री वाशी सेक्टर-११ मधील कपिल किनारा या बारवर छापा मारून बारमध्ये काम करणाऱ्या चार महिला वेटरसह मॅनेजर आणि ग्राहक अशा एकूण सात जणांना ताब्यात घेतले आहे. बारमधील महिला या ग्राहकांसोबत अश्लील हावभाव व अंगविक्षेप करताना आढळून आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
वाशी सेक्टर-११ मधील कपिल किनारा या लेडीज बारमध्ये काम करणाऱ्या महिला वेटर अश्लील हावभाव करून ग्राहकांसोबत शारीरिक लगट करत असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी खातरजमा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक देशमुख व त्यांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कपिल किनारा या बारवर छापा मारला. या वेळी महिला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करून शारीरिक लगट करीत असल्याचे तसेच तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करीत असल्याचे आढळून आले. मॅनेजर त्यांना तसे करण्यास उत्तेजन देत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

