आज अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी होणार जाहीर

आज अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी होणार जाहीर

Published on

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज होणार जाहीर
मुंबई, ता. २५ : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन कॅप (केंद्रीभूत प्रवेश प्रकिया)च्या पहिल्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. २६) दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास जाहीर केली जाणार आहे. या फेरीसाठी नोंदणी केलेल्या आणि पसंतीक्रम नोंदवलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या आवडीचे गुणवत्तेनुसार महाविद्यालयनिहाय प्रवेश जाहीर केले जातील. यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी राज्यभरातील नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ४० इतकी प्रवेश क्षमता असून, यातील कॅप फेरीसाठी १८ लाख ९७ हजार ५२६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी राज्यभरातून तब्बल १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यात विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालयात प्रवेश दिले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com