ऐरोलीतील डॉ. आंबेडकर स्मारकात शैक्षणिक केंद्र

ऐरोलीतील डॉ. आंबेडकर स्मारकात शैक्षणिक केंद्र

Published on

ऐरोलीतील डॉ. आंबेडकर स्मारकात शैक्षणिक केंद्र
मुंबई विद्यापीठ आणि नवी मुंबई महापालिकेत करार
मुंबई, ता. २५ : नवी मुंबई महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी
मुंबई विद्यापीठ आणि नवी मुंबई महापालिकेत सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार या शैक्षणिक वर्षापासून ‘डॉ. आंबेडकरांचे विचार’ या विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि मुंबई विद्यापीठाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांव्यतिरिक्त, सामाजिक न्याय, भारतीय संविधान, महिला सक्षमीकरण, मानवाधिकार, कामगार कल्याण, पाली भाषा आणि बाल हक्क हे अतिरिक्त विशेषीकरण क्षेत्रे शैक्षणिक उपक्रमासाठी निवडण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात अभ्यासकांसाठी ग्रंथसंपदा व ई-लायब्ररीची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. या स्मारकाचा उपयोग अभ्यासकांप्रमाणेच जनसामान्यांना व्हावा, अशी भूमिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com