भावली योजनेत टक्केवारी घेतली!
भावली योजनेत टक्केवारी घेतली!
बाळ्यामामा म्हात्रे यांचा आरोप
शहापूर, ता. २५ (वार्ताहर) : शहापूर तालुक्याच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर भावली धरणावरील नळ योजनेचे श्रेय घेणाऱ्यांनी या योजनेच्या कामातील टक्केवारी घेतल्याचा थेट आरोप खासदार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी बुधवारी (ता. २५) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.
ते म्हणाले, ‘शहापूरचा पाणीप्रश्न गंभीर आहे. भावली प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव निधीला मंजुरी दिली; परंतु जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम जाणीवपूर्वक रखडवले गेले. येथील ठेकेदारांना फक्त जलवाहिन्या टाकण्याच्या कामात स्वारस्य आहे. तसेच या योजनेचे श्रेय घेणाऱ्यांना ठेकेदाराची बिले मंजूर करून त्यातील टक्केवारी घेण्यात स्वारस्य आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. महसूल मंत्र्यांकडे भावली पाणीपुरवठा योजनेतील जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव पडून होता. त्याचा पाठपुरावा केल्याने आता जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचेही खासदार म्हात्रे यांनी या वेळी सांगितले. शहापुरातील भावली पाणीपुरवठा योजनेवरून खासदार म्हात्रे यांनी बुधवारी केलेल्या टक्केवारीच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

