अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन
अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन
मुंबई, ता. २८ : ‘कांटा लगा’ या सुपरहिट अल्बममधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला (वय ४२) हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे तिला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केले होते; मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
२००२ मध्ये प्रदर्शित झालेले ‘कांटा लगा’ या संगीत अल्बममधून शेफालीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. १९६४ साली आलेल्या ‘समझौता’ या चित्रपटातील मूळ गाण्याचे हे रिक्रिएटेड व्हर्जन होते, ज्यात शेफालीच्या बोल्ड लूकची विशेष चर्चा झाली. यानंतर तिने ‘नच बलिये ५’ आणि ‘नच बलिये ७’ यांसारख्या रिॲलिटी शोमध्ये सहभाग घेतला. २०१९ मध्ये ती ‘बिग बॉस १३’ची स्पर्धकही राहिली होती. शेफालीचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी अहमदाबाद येथे झाला होता. तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. तिचे पहिले लग्न २००४ मध्ये संगीतकार हरमीत सिंगसोबत झाले; मात्र २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१५ मध्ये तिने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. शेफालीच्या निधनाने हिंदी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिनेत्रीची आठवण कायम राहील, असे म्हणत अनेकांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.