ठाणे पालिकेची प्रणाली राज्यभर अमलात आणा

ठाणे पालिकेची प्रणाली राज्यभर अमलात आणा

Published on

ठाणे पालिकेची प्रणाली राज्यभर अमलात आणा
बेकायदा बांधकामांबाबत आदेश

मुंबई, ता. २९ ः बेकायदा बांधकामांवरील कारवाईतील निष्क्रियेतवरून न्यायालयाने फटकारल्यानंतर बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका आयुक्तांनी विशेष कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली आहे. त्याची अंमलबजावणी आणि काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती नुकतीच ठाणे पालिकेकडून प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात देण्यात आली. त्याची दखल घेऊन राज्यभर अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
हरित पट्ट्यातील आपल्या मालकीच्या ५.५ एकर जमिनीवर १७ बेकायदा इमारती उभ्या राहिल्याचा आरोप करून सुभद्रा टकले यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन इमारतींवर कारवाई करण्याच्या आदेशाची मागणी केली होती. न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेऊन या इमारतींवर तातडीने कारवाई करण्याचे आणि न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते.  या पार्श्वभूमीवर, या १७ इमारतींवरील कारवाईचा अहवाल ठाणे महापालिकेच्या वतीने न्यायालयात सादर केला. त्याच वेळी ठाण्यातील बेकायदा इमरातींवरील कारवाई सुरू ठेवण्याच्या दृष्टीने एक विशेष कार्यप्रणाली आखण्यात आल्याची माहितीही ठाणे महापालिकेच्या वतीने वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी आणि वकील मंदार लिमये यांनी न्यायालयाला देऊन कार्यप्रणालीही न्यायालयात सादर केली. त्याची दखल घेऊन राज्यभर अंमलबजावणी करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.
आयुक्तांनी तयार केलेल्या कार्यप्रणालीनुसार, बेकायदा बांधकामांवरील कारवाईचे इमारतनिहाय वेळापत्रक अधिकाऱ्यांनी तयार करावे. जागामालक आणि रहिवाशांकडून इमारत पाडण्यासाठी येणारा खर्च वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
...
दुर्लक्ष करण्यावरून ताशेरे
बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी २००९ मध्ये तत्कालीन नगरविकास सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी कठोर धोरण आखले होते. त्याबाबतचा शासन निर्णयही काढण्यात आला. हा शासन निर्णय अमलात आला असता, तर मुंबई-ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मोठ्या प्रमाणात आणि अनियंत्रितपणे बेकायदा बांधकामे उभी राहिली नसती. तसेच बेकायदा बांधकामांची समस्या उद्भवली नसती, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले होते, मात्र त्या शासन निर्णयाची एकाही महापालिकेकडून अंमलबजावणी करण्यात आली नाही, अशी टीकाही न्यायालयाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com