खारघरसह ओवे डोंगरावर पर्यटकांची वाढली गर्दी

खारघरसह ओवे डोंगरावर पर्यटकांची वाढली गर्दी

Published on

खारघरसह ओवे डोंगरावर पर्यटकांची वाढली गर्दी
खारघर, ता. ३० (बातमीदार) : पावसाळ्यातील मुख्य आकर्षण असलेला खारघर आणि ओवे डोंगरावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मागील काही दिवसांपासून पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे, मात्र पर्यटनांचा आनंद घेताना सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खारघर शहराला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. पावसाच्या सरीने सजलेले डोंगर, चोहोबाजूने फुलून गेलेला हिरवागार निसर्ग, ओढ्यात वाहणारे निळसर पाणी आणि धुक्याची दुलईत लपेटलेले वळणदार रस्‍ते, डोंगर यामुळे शनिवार आणि रविवारसह सुट्टीच्या दिवशी पर्यटक निसर्गाचा आनंद घेताना दिसून येत आहेत. डोंगरावरील नयनरम्य रूप आणि हिरवागार शालू पांघरलेला निसर्ग पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्‍यामुळे खारघर सेक्टर-५, गोल्फ कोर्सलगत असलेला ओढा, धबधबा तसेच पांडवकडा धबधबा, खारघर डोंगर आणि तळोजा मध्यवर्ती कारागृहाशेजारील डोंगर माथा, फणसवाडी पाड्यालगत असलेल्या वाघदेवी मंदिराजवळील डोंगरावरून नवी मुंबईचा तर चाफेवाडी पाड्यासमोरील डोंगरावरून खारघर, पनवेल शहराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. गेल्या तीन, चार दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे डोंगरावरील निसर्गाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com