पनवेल महापालिकेचा हरित उपक्रम
पनवेल महापालिकेचा हरित उपक्रम
वृक्षारोपणासाठी नागरिकांना मोफत रोपांची सुविधा
पनवेल, ता. ३० (बातमीदार) ः ‘स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल, हरित पनवेल’ या संकल्पनेखाली पनवेल महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या विविध उद्यान केंद्रांवरून नागरिकांना मोफत देशी वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली जात आहेत. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी केली आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार पनवेल महापालिकेने व्यापक वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध ठिकाणी एक लाखाहून अधिक झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. याची सुरुवात पर्यावरणदिनानिमित्ताने महापालिकेच्या चारही प्रभागात ११०० झाडांचे रोपण करून करण्यात आली आहे. तसेच मागील महिन्यात अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वृक्षलागवड समिती स्थापन करण्यात आली आहे. याबरोबरच महापालिकेच्या या व्यापक वृक्षारोपण मोहिमेत पनवेलकरांनी सहभागी व्हावे, याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, एनएसएस विभाग शिक्षक, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनीधींची नियोजन बैठक अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार विविध शाळा, महाविद्यालये, एनएसएस विभाग, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांनी, नागरिकांनी महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी विविध प्रभागातील उद्यान पर्यवेक्षकांशी संपर्क साधून रोपे घेण्याचे आवाहन उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी महापालिकेच्या वतीने केले आले आहे.
.................
नागरिकांनी महापालिकेच्या विविध प्रभागातील उद्यान पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा.
१. अ – खारघर
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके उद्यान, सेक्टर-१२, प्लॉट क्र. ०१, खारघर
नितीन राठोड – मो. नं. ९३७३८१३४६७ /८९९९६११९४४
२. तळोजा
सेक्टर-१४, प्लॉट क्र. १९, तळोजा
नितीन राठोड – मो. नं. ९३७३८१३४६७ /८९९९६११९४४
३. ब – कळंबोली
सेक्टर-२०, प्लॉट क्र. २६, रोडपाली पोलिस मुख्यालय समोर, कळंबोली
विशाल हुडेकर – मो. नं. ९४०४४३९३४५
३. क – कामोठे
सेक्टर-२०, प्लॉट क्र. २८ + ३५-३६, स्मशानभूमीसमोर, कामोठे
मांगीलाल जाधव – मो. नं. ७७७००३०५८२
४. ड – पनवेल
सेक्टर-१६, प्लॉट क्र. ३, पिल्लई काॅलेजच्या मागील बाजूस, नवीन पनवेल
सिद्धार्थ कांबळे – मो. नं. ९६५०७२०९३३
..............
चौकट
वृक्षारोपण मोहिमेतील वृक्षांची नावे
बहावा, ताम, कांचन (गुलाबी), कांचन (सफेद), समुद्रफळ, फणस, रबर, सोनचाफा, पारिजातक, बकुळ, तुती, कदंब, करंज, अर्जुन, शमी, काजू, सीता अशोक, जांभूळ, बेल, चाफा (लाल), शार्दूल, कोनोकारपस
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.