नेरूळमधील भोपी कुटुंबाचा वारीचा वसा
जुईनगर, ता. ३० (बातमीदार) : ज्येष्ठ महिन्यातील पंधरवडा संपताच पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी सज्ज होतात. महिनाभर अगोदरच त्यांना आषाढी वारीचे वेध लागलेले असतात. राज्यातील विविध भागातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरला निघतात. अशीच दिंडीची परंपरा नेरूळ येथील भोपी परिवाराने जपली आहे. कोपरखैरणे आणि घणसोली येथील वारकऱ्यांसह पुण्यापर्यंत वाहनाने प्रवास करून तेथून पायी वारीला नेरूळ येथील भोपी कुटुंबातील माउलींची सुरुवात होते.
नेरूळ गावातील नर्मदा भोपी यांच्या सासऱ्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ पांडुरंगाची पायी वारी केली आहे. त्यांनी भोपी परिवारात पायी वारीचा वारसा निर्माण केला. त्यांच्यानंतर नर्मदा भोपी, अलका भोईर, निर्मला भोपी, सुशिलाबाई भोपी, फाशीबाई भोपी, लक्ष्मीबाई भोपी, वंदना भोईर यांच्यासह गावातील इतर पुरुष-महिला या दिंडीत सहभागी होत असतात. या संपूर्ण वारकऱ्यांचीसुद्धा गेली ३० वर्षांहून अधिक पायी वारीचा परंपरा आहे. यावर्षीदेखील या माउलींनी आठ दिवसांपूर्वी पुणे गाठून तेथून पायी वारीचा प्रवास सुरू केला आहे.
---------------
वृद्धापकाळातही २० किलोमीटरचा पायी प्रवास
नर्मदा भोपी यांचे वय ७० वर्ष असून, आपल्यासोबतच्या महिलांसह जवळपास महिनाभर प्रतिदिन सरासरी २० किलोमीटर पायी प्रवास ही माउली करते. हरिनामासह, हरिपाठ, भजन व कीर्तन आणि डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखात पांडुरंगाचे नाव घेऊन हा प्रवास आजही अविरतपणे सुरू आहे.
----------------------
१५ दिवस आधीपासून तयारी
जवळपास १५ दिवस आधीपासून नर्मदा भोपी यांच्या घरी पैसे, वस्तू अथवा इतर स्वरूपाचे दान पांडुरंगाला देण्यासाठी गावकरी येत असतात. दिंडीमधील संपूर्ण लोकांना चहा-नाष्टादेखील बनवण्याचे काम नर्मदा भोपींसह इतर माऊली करत असतात. शेवटच्या तीन दिवसांत नर्मदा भोपींचे संपूर्ण कुटुंब पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला असतात; तर दिवशी एकादशीचा उपवास सोडून या सर्व माउली आपल्या परतीच्या प्रवासाला लागतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.