अधिवेशनाच्या प्रारंभी  सभापती-उपसभापतींना शुभेच्छा

अधिवेशनाच्या प्रारंभी सभापती-उपसभापतींना शुभेच्छा

Published on

अधिवेशनाच्या प्रारंभी सभापती, उपसभापतींना शुभेच्छा

मुंबई, ता. ३० : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा राज्य शासनातील मंत्र्यांनी सन्मान केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुष्पगुच्छ देत सभापती आणि उपसभापती यांना औपचारिक शुभेच्छा दिल्या. या वेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, शंभूराज देसाई तसेच विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. या औपचारिक आणि सौहार्दपूर्ण भेटींमुळे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सकारात्मक वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी उपस्थित सदस्यांनी अधिवेशनातील आगामी कामकाज रचनात्मक, शिस्तबद्ध आणि सुसंवादात्मक पद्धतीने पार पडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com