पेरणी क्षेत्राची बांधावरच नोंद

पेरणी क्षेत्राची बांधावरच नोंद

Published on

शहापूर, ता.१ (वार्ताहर): महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे अधिकाऱ्यांनी आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. भात खरेदी प्रक्रियेतील गैरप्रकारांना कायमचा आळा बसावा, यासाठी हा उपक्रम केला जात आहे.
शेतमालाची आणि संबंधित शेतकऱ्यांची माहिती एनइएमएल या राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलवर नोंदवली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या योजनेत अनियमितता आणि गैरप्रकार निदर्शनास आले. पीकपेरा कमी असतानाही अधिक दाखवून भात विक्रीचा प्रयत्न करणे, बनावट सातबारा उताऱ्यांचा वापर, शेतकऱ्यांकडून वेळेवर इ-पीक पाहणी न करणे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्याने शेतकऱ्यांचे चुकारे अडकणे या गंभीर समस्यांचा समावेश होता. आता त्याला आळा बसणार असल्याचा दावा आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. शहापूर तालुक्यात सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रांद्वारे दरवर्षी हंगामी भात खरेदी केली जाते. त्यानुसार तालुक्यात पेरणी क्षेत्राची नोंदणी सुरु असल्याचे महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी तुषार वाघ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com