देवनारमधील प्राणी स्मशानभूमीला विरोध

देवनारमधील प्राणी स्मशानभूमीला विरोध

Published on

देवनारमधील प्राणी स्मशानभूमीला विरोध
इतरत्र प्रकल्‍प हटवण्याची स्‍थानिकांची मागणी
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १ ः देवनार पशुवधगृह जागेत देवनार प्राणी स्मशानभूमी बांधण्यात येत आहे. या प्रकल्‍पामुळे सार्वजनिक आरोग्य, पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे ही स्मशानभूमी इतर जागी हटवण्यात यावी, अशी मागणी संतप्त रहिवाशांनी केली आहे.
मुंबईत कुत्रे, मांजर अशा पाळीव प्राण्यांची संख्या जास्त आहे. कित्येक घरात प्राण्यांचे स्‍थान हे कुटुंबातील सदस्‍याप्रमाणे असते. आजारपण, अपघात, वृद्धापकाळाने प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येते. डिफेन्स ऑफ ॲनिमल्स संस्था व पालिकेद्वारे देवनार पशुवधगृहात एकूण ५०० स्क्वेअर फुटांचा सर्वात मोठे प्राणी स्मशानभूमी भस्मीकरण प्रकल्प उभारला जात आहे.
गोवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून, नऊ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. या परिसरात देवनार डम्‍पिंग ग्राउंड, एसएमएस कंपनी व पशुवधगृह आहे. त्यामुळे गोवंडी, देवनार, शिवाजी नगर, मानखुर्द, चेंबूर हे सर्वात मोठे प्रदूषणाचे परिसर म्हणून ओळखले जातात. श्वसनाच्या समस्या, ॲलर्जी, त्वचेचे रोग आणि इतर आजारांना या परिसरातील रहिवाशांना सामोरे जावे लागत असताना हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होणार असल्याने या प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे.
राज्य शासनाला प्राण्यांची काळजी वाटते, मात्र माणसाची काळजी वाटत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सरकार व पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला आहे. हा प्रकल्प त्वरित हटवा अन्यथा न्यायालयात लढा देण्याचा इशारा नागरिक कल्याण मंच, पंचशील एसआरए रहिवाशांनी दिला आहे.

काम थांबवा!
अनिवासी, औद्योगिक क्षेत्रात प्रकल्प स्थलांतरित करा, नागरिक समिती आणि सार्वजनिक आरोग्य देखरेख पथकाची नियुक्ती करा, अशी मागणी येथील रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिकेकडे केली आहे.

आम्ही गोवंडीमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी यापूर्वीही लढा दिला आहे. आम्ही आताही नागरिकांच्या हक्कांसाठी न्यायालयीन लढाई लढणार आहोत. लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी लढणे हे आमच्या जीवनाचे ध्येय आहे.
- फय्याज शेख,
अध्यक्ष, गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटी

प्रशासन आमच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे याचा परिणाम आमच्या आरोग्यावर होणार आहे. आमच्या आरोग्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे.
- शुभ्रा जाधव, विद्यार्थिनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com