लायन्स क्लबच्या कौशल्य विकास केंद्राचे उद्‍घाटन

लायन्स क्लबच्या कौशल्य विकास केंद्राचे उद्‍घाटन

Published on

विरार (बातमीदार) : लायन्स क्लब ऑफ वसईतर्फे रानपाडा परिसरात या दुमजली कौशल्य विकास केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले. या ठिकाणी गरीब महिला आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रम शिकवण्याची सोय करण्यात आली आहे. महिलांसाठी शिलाई काम, तर विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य लाभणार आहे. संतोष शेट्टी यांच्या लायन्स क्लब सेव्हन बंगलो यांच्याकडून केंद्रासाठी संगणक देण्यात आले आहेत. फिशरमन सोसायटीच्या जितू मेहेर यांनी ही जागा उपलब्ध करून दिली. या केंद्राच्या बांधकामासाठी संदीप म्हात्रे यांच्या थर्मोलॅब सेल्स ॲण्ड सर्व्हिसेस या कंपनीने अर्थसाह्य केले. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भारती पवार आणि हनुमंत भोसले हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com