कल्याण फाट्यावर तासभर कोंडी
अपघातामुळे कल्याण फाट्यावर कोंडी
अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : डोंबिवलीकडे जात असलेल्या एका केमिकल टँकरने मंगळवारी (ता. १) मध्यरात्री दीड ते पावणे दोनच्या सुमारास शिळ-कल्याण फाट्यावर एका वाहनाला धडक दिली. यात अपघातामुळे चालक ओमप्रकाश यादव टँकरच्या केबिनमध्ये अडकून पडला. या चालकाची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले; मात्र अपघातामुळे जवळपास तासभर रस्त्यावर कोंडी झाली होती. चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
टँकरचालक यादव हे टँकरमध्ये २४ टन ॲनिलिन हे केमिकल घेऊन गुजरात येथून डोंबिवलीला येत होते. मंगळवारी मध्यरात्री दीड ते पावणे दोनच्या सुमारास टँकर घेऊन ते शिळ-कल्याण फाटा येथे पोहोचले. याचदरम्यान चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने ते एका वाहनाला जाऊन धडकले. ही धडक इतकी जोरात होती की, चालक हे त्या केबिनमध्ये अडकले होते. या अपघाताने वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच याघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलिस अधिकारी व अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. तसेच चालकाला सुखरूप बाहेर काढले. तसेच अपघातग्रस्त टँकरला हायड्रा मशीनच्या साहाय्याने सुमारे ३० मिनिटांच्या प्रयत्नानंतर रोडच्या एका बाजूला करण्यात आले. अपघातामुळे ठाण्याकडून कल्याणफाट्याकडे जाणारी वाहतूक सुमारे ३० मिनिटे धिम्या गतीने सुरू होती. अपघातग्रस्त टँकर रोडच्या बाजूला केल्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.