पनवेलमध्ये दोघांकडून हेरॉईन जप्त
नवीन पनवेल, ता. १ (बातमीदार) : दोन इसम बेकायदा हेरॉइन घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी ते टी पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाजवळ शहर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. सतनाम सिंग सुखदेव सिंग (वय ३१), सुखविंदर सिंग मुकनार सिंग (५९) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असून, त्यांच्याकडून ३५ ग्रॅम वजनाचे हेरॉइन पोलिसांनी जप्त केले आहे. पंजाब येथून हेरॉइन घेऊन जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला आणि दोघांनाही हेरॉइनसह ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक अभिजित अभंग, उपनिरीक्षक हजरत पठाण, प्रवीण मेथे, रवींद्र पारधी, साईन मोकल, शशिकांत काकडे यांच्या पथकाने कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.