सानपाडा येथे पर्यावरणप्रेमींकडून वृक्षारोपण
जुईनगर, ता. १ (बातमीदार) : सानपाडा येथील पर्यावरणप्रेमींकडून वृक्षारोपण करण्यात आले. दरवर्षी रोपांची लागवड करीत त्यांचे संवर्धन करण्याचा विडा येथील वृक्षप्रेमींनी उचलला आहे. त्याअनुषंगाने प्रतिवर्षी १० झाडे लावून त्याची काळजी घेण्याचे काम येथील पर्यावरणप्रेमी करीत आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा उपक्रम हाती घेत शेकडो रोपांची लागवड मित्र परिवाराने आजपर्यंत केली आहे. सेक्टर दोन, चार, सात, आठ आणि पाम बीच मार्गालगत असलेल्या परिसरात नियमितपणे पर्यावरणप्रेमींकडून वृक्षारोपण करण्यात येते. सानपाडा सेक्टर आठ येथील गणपती मंदिराजवळ वृक्षारोपण करण्यात आले. काही वर्षांपूर्वी मंदिराजवळील धोकादायक झाडे पालिकेने काढून टाकली होती; मात्र त्या ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करण्यात आले नव्हते. त्या जागेवर आज रोपांची लागवड करण्यात आली. सानपाडा हरित ठेवण्यासाठी अजय पवार, विकास वाघुले, अनिल गव्हाणे, तेजा वाढेल आणि अरुण मिश्रा हे प्रयत्न करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.