वाशीत कचऱ्याचे डबे पुरविण्याची मागणी
नेरूळ, ता. १ (बातमीदार) : वाशी सेक्टर २८ आणि २९ मध्ये कचरा टाकण्यासाठी कचऱ्याचे डबे नसल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना नवी मुंबई महापालिकेतर्फे कचऱ्याचे डबे द्यावेत, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या सदस्य माधुरी काळे यांनी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. वाशी सेक्टर २८, २९ मधील आणि गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे डबे मिळण्यास विलंब होत आहे. महापालिकेच्या नियमावलीनुसार, प्रत्येक वर्षी नवीन कचऱ्याचे डबे वाटप होणे आवश्यक आहे. यापूर्वी २०२० मध्ये प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीला कचऱ्याचे डबे मिळाले होते; मात्र त्यानंतर नवीन डबे मिळालेले नाहीत. त्यामुळे हाउसिंग सोसायटी परिसरात अस्वच्छता पसरत असून, रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वॉर्ड क्रमांक ५४ मधील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेमार्फत कचऱ्याचे डबे देण्यात यावे, अशी मागणी माधुरी काळे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.