उपाशीपोटी रस्त्यावर ठिय्या

उपाशीपोटी रस्त्यावर ठिय्या

Published on

शहापूर, ता.१ (वार्ताहर): धसई गावातील हायस्कुलमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना परतीच्या प्रवासासाठी बस थांबत नसल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी शहापूरहून कोठारे गावाकडे जाणाऱ्या बससमोर ठिय्या आंदोलन केले.
शहापूर तालुक्यातील सारंगपुरी, मुरबीचापाडा, अवकळवाडी, कोठारे, पोकळ्याचीवाडी, जळक्याचीवाडी परिसरातून तब्बल ८० हून अधिक विद्यार्थी १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या धसई गावातील स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा भेरे विद्यामंदिर शिक्षणासाठी येतात. या हायस्कूलमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी ६ वाजता घरातून निघावे लागते. त्यामुळे रिकाम्यापोटीच शाळेत पोहोचतात. यातील बहुसंख्य विद्यार्थी आदिवासी, अनुसूचित जमातीचे आहेत. भुकेलेले विद्यार्थी दुपारी शाळा सुटल्यावर घर गाठण्यासाठी घाई करतात. अशातच ४ दिवसांपासून १२ ते १२:३० च्या दरम्यान शहापूरहून कोठारे गावाकडे जाणारी बस पूर्ण क्षमतेने भरुन येत असल्याने धसई येथे थांबत नसल्याने पावसाच्या दिवसांत ओढाताण होत आहे.
--------------------------------
आमदारांच्या गावातील मुलांची परवड
कोठारे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे गाव आहे. या गावातील विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश मिळत नसल्याने भुकेलेले विद्यार्थी वेळेवर घरी पोहचत नसल्याने पालकही संतापले आहेत. विद्यार्थ्यांना बस प्रवासासाठी अवहेलना सहन करावी लागली. त्यामुळे आमदारांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
------------------------------------
आमच्या भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात. त्यांना बसशिवाय पर्याय नाही. शाळेत जाण्यासाठी पहाटे उपाशीपोटी घरातून निघावे लागते. अशा परिस्थितीत चार दिवसांपासून बसमध्ये प्रवेश मिळत नसल्याने आंदोलन करावे लागले.
- संतोष गिरा, पालक, पोकळ्याचीवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com