पेणमध्ये सिमेंटचे विद्युत पोल कोसळला
पेणमध्ये सिमेंटचा विद्युत पोल कोसळला
घटना रात्री घडल्याने मोठा अनर्थ टळला
पेण, ता. १ (वार्ताहर) : पेणमध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्युत विभागाचा सावळागोंधळ सुरू आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असतानाच सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील गुरुकुल शाळेजवळ वाहनाच्या धडकेने सिमेंटचा विद्युत पोल पडल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. हा अपघात रात्री घडल्याने मोठा अनर्थ टळला.
महावितरणकडून शहरात अनेक ठिकाणी विद्युत सिमेंटचे पोल उभारले जात आहेत. त्यातच सोमवारी मध्यरात्री शहरातील गुरुकुल शाळेजवळील सिमेंटचा विद्युत पोल वाहनाच्या धडकेत पडल्याची घटना घडली. सुदैवाने हा अपघात रात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या पोलबद्दल शहरातील नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. या अपघातामुळे विद्युत तारा अस्ताव्यस्त पडल्या होत्या. शिवाय परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान, सकाळी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. परंतु यादरम्यान शिक्षकांसह विद्यार्थी, पालकवर्गाची तारांबळ उडाल्याने महावितरणला अडचण निर्माण झाली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोल बाजूला करण्यात आला. या घटनेमुळे शहरातील सर्व विद्युत पोल लोखंडी बसविण्यात यावे, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात आली आहे.
................
गुरुकुल शाळेजवळ रात्री विद्युत पोल पडला. अज्ञात वाहनाची पोलला धडक लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्या ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांनी जाऊन तिथे लोखंडी पोल बसविण्याचे काम सुरू केले आहे.
- सिद्धार्थ खोब्रागडे, पेण, विद्युत अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.