रोलबॉल वर्ल्ड कप

रोलबॉल वर्ल्ड कप

Published on

भारतीय ज्युनिअर मुले व मुलींनी जिंकला रोल बॉल विश्वचषक
भारत, श्रीलंका, केनिया, साऊथ सुधान, कांगो, टांझानियाचा स्पर्धेत सहभाग
कल्याण ता. १ (वार्ताहर) : इंटरनॅशनल रोल बॉल फेडरेशन आणि केनिया रोल बॉल फेडरेशनच्या माध्यमातून २२ ते २८ जूनदरम्यान केनियामधील नैरोबी येथे पहिली ज्युनियर रोल बॉल विश्वचषक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, केनिया, साऊथ सुधान, कांगो, टांझानिया या सहा देशांनी सहभाग घेतला होता. यात भारताच्या मुले आणि मुलींच्या संघाने विजय प्राप्त केला.
उद्‍घाटनप्रसंगी रोल बॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, महाराष्ट्र राज्य व भारतीय रोल बॉल संघ सचिव प्रताप पगार, उपाध्यक्ष मनोजकुमार यादव, आय. एस. अधिकारी मनोहर कांत, केनिया रोल बॉल फेडरेशन अध्यक्ष लिताबा, महासचिव युसूफ हे मान्यवर उपस्थित होते. केनिया रोल बॉल फेडरेशनने ज्युनिअर रोल बॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.
ज्युनिअर रोल बॉल विश्वचषकात भारत विरुद्ध केनिया हा अंतिम सामना चुरशीचा झाला. या सामन्यात ५-१ने भारत ज्युनिअर मुलांचा संघ विजयी झाला. तर मुलींचा अंतिम सामना भारत विरुद्ध केनिया झाला. भारताच्या मुलींच्या संघाने केनिया संघावर एकतर्फी (५-०) विजय संपादन केला. तिशा पंडित (ठाणे) हिने सर्वोत्कृष्ट खेळ करून भारताला विजय प्राप्त करून दिला. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक कोच राज शेखर (तमिळनाडू) व मुलींच्या संघाच्या प्रशिक्षिका हेमंगिनी काळे (महाराष्ट्र) यांचे मार्गदर्शन खेळाडूंना मिळाले. भारतीय ज्युनिअर मुले व मुली यांनी विश्वचषक जिंकल्याबद्दल ठाणे जिल्हाध्यक्ष अलबिन एंथोनी, प्रताप पगार आणि राजू दाभाडे यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com