अत्यावश्यक सेवेवर होणार परिणाम

अत्यावश्यक सेवेवर होणार परिणाम

Published on

अत्यावश्यक सेवेवर होणार परिणाम
अवजड माल वाहतूकदारांचा आजपासून बेमुदत संप
पनवेल ता. १ (बातमीदार) ः ई-चालान तसेच इतर अन्यायकारक कायद्यांच्या विरोधात आजपासून (ता. १) अवजड माल वाहतूकदारांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जेएनपीए येथील ३८ हजार कंटेनरचालकांसह एलपीजी वाहक, मालवाहतूक करणारे ट्रक, पाणीवाहक टॅंकर सहभागी होणार असल्याने अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार आहे.
अन्यायकारक ई-चालान कारवाई थांबवणे, यापूर्वीच दंड माफ करावा, क्लीनर अनिवार्य न करणे यासह विविध मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांनी संप पुकारला आहे. या संपात ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस, बस अँड कार कॉन्फिडरेशन, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघ, इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन महाराष्ट्र, एलपीजी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य अशा जवळपास ३० संघटना सहभागी होत आहेत.
----
जेएनपीएतील ३८ हजार कंटेनर थांबणार
माल वाहतूकादारांच्या संपात जीएनपीएतील ३८ हजार कंटेनरचालक सहभागी होणार असल्याने बंदरातील माल वाहतूक ठप्प होणार आहे.
त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
----
महाराष्ट्रातील सर्व वाहतूक संघटना १ जुलैच्या मध्यरात्रीपासून कोणतीही व्यावसायिक गाडी रस्त्यावर सोडणार नाहीत. ई-चालानच्या बेबंद आकारणीविरोधात आणि मागील सर्व चालान माफ करण्यासाठी हे आंदोलन आहे.
- प्रवीण पैठणकर, अध्यक्ष, वाहतूक संघटना, नवी मुंबई
----
कोट
आधीच देशोधडीला लागलेला वाहतूक व्यवसाय ई-चालान प्रणालीमुळे आणखी गोत्यात आला आहे. गाडी रस्त्यावर आली की ई-चालान ठरलेलेच आहे. त्यामुळ व्यवसाय करावा की नाही, हा प्रश्न आहे.
- बापूराव ढेंबरे, वाहतूक व्यावसायिक, न्हावाशेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com