महावितरणच्या ५ लाख ग्राहकांनी नाकारले कागदी वीजबिल

महावितरणच्या ५ लाख ग्राहकांनी नाकारले कागदी वीजबिल

Published on

महावितरणच्या ग्राहकांनी नाकारले कागदी वीजबिल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महावितरणच्या तब्बल पाच लाख वीज ग्राहकांनी गो ग्रीनअंतर्गत ई-मेलद्वारे बिल मिळवण्याचा पर्याय निवडला आहे. वीजबिलाच्या छपाईबरोबरच बिल वितरणाच्या कटकटीतून सुटका हाेऊन त्यासाठी लागणाऱ्या कागदाची बचत व्हावी म्हणून महावितरणने गो ग्रीन मोहीम सुरू केली. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी गो ग्रीन योजनेत सहभागी होण्याची ऑनलाइन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणच्या मोबाईल अ‍ॅप आणि www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीज ग्राहकांनी गो ग्रीन योजनेमध्ये सहभाग घेऊन पर्यावरणपूरक योजनेत योगदान द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. हा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात वार्षिक १२० रुपयांचा फायदा होत आहे. या योजनेत आतापर्यंत पाच लाख तीन हजार ७९५ पर्यावरणस्नेही वीज ग्राहकांचा सहभाग, तर सहा कोटी चार लाख ५५ हजार ४०० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com