क्रॉफर्ड मार्केटमधील भूखंड कोळी समाजाला द्या!
क्रॉफर्ड मार्केटमधील भूखंड कोळी समाजाला द्या!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई वाचविण्याकरिता आणि मुंबईमध्ये कोळी समाजाचे अस्तित्व टिकविण्याकरिता क्रॉफर्ड मार्केटमध्ये असलेला मासळी मंडईचा भूखंड ३० वर्षे भाडे करारावर कोळी समाजाला देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली असून, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे या मागणीचे निवेदन सादर केले आहे.
क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी मार्केटचा भूखंड शासकीय कार्यालयासाठी राखीव ठेवण्यात आलेला असून, २०१८मध्ये मासळी मार्केटचे आरक्षण हटविण्याचे कटकारस्थान पालिकेकडून करण्यात आल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी म्हटले आहे. या मासळी मंडईत सुमारे ३४८ परवानाधारक मासळी व्यापारी असून, दररोज राज्यभरातून १५ हजारांहून अधिक मासळी व्यावसायिक तसेच १५०-२०० मासळी वाहने दररोज मासळी मंडईत येत असून, दोन हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल या मंडईत होत असल्याने मासळी व्यवसायातील मोठे आर्थिक व्यापार केंद्र म्हणून मंडईची ओळख आहे, अशी माहिती तांडेल यांनी दिली. हा भूखंड उद्योजकाला न देता भूमिपुत्रांना देण्याची मागणी निवेदनाद्वारे तांडेल यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.