विनयभंगप्रकरणी चोवीस तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

विनयभंगप्रकरणी चोवीस तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

Published on

विनयभंगप्रकरणी चोवीस तासात न्यायालयात दोषारोपपत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : क्लासवरून घरी एकटी जाणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग किसन नगर परिसरात झाला. याप्रकरणी आरोपी दिनेश विवेक घाग याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. तसेच पीडित मुलीचा व फिर्यादीचा जबाब नोंदवून कारवाई पूर्ण करून सबळ पुराव्यानिशी आरोपीविरोधात २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडित मुलगी ही रविवारी (ता. २९) ही सकाळी १० वाजण्याच्या सुमारास क्लासवरून घरी एकटीच येत होती. या वेळी एका अनोळखी व्यक्तीने पीडितेचा एमआरआर रुग्णालय ते शास्त्रीनगर असा कारने पाठलाग केला. तसेच गाडीमध्ये येण्याचा इशारा केला व थोड्या वेळाने निघून गेला. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने वर्तकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण व तपास पथक यांनी घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून गुन्ह्यातील गाडीचा शोध घेत त्याचा नंबर प्राप्त केला.
आरोपी हा ठाण्यातील किसन नगर नं. तीन या भागात राहात असल्याचे समजले. त्या भागात शोध घेत असता तो बाहेर असल्याचे समजले. त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला. या वेळी कल्याण खडकपाडा येथील एका बारमधून पळून जाण्याच्या तयारीत असताना दिनेश घाग याला अटक केली.
ही कारवाई वागळे परिमंडळ पाचचे उपायुक्त प्रशांत कदम, साहाय्यक पोलिस आयुक्त (वर्तकनगर विभाग) मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मल्हारी कोकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीपकुमार वेडे, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण, पोलिस हवालदार जाधव, राठोड, झेमने, कांडेलकर, पोलिस नाईक पाटोळे, पोलिस शिपाई सौदागरे, नागरे कात्राबाद यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com