युवा सेनेचा पॅटर्न राज्यभर राबवणार
वाशी, ता. २ (बातमीदार) : नवी मुंबई युवासेनेच्या माध्यमातून चौक सभा घेऊन येथील नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या जात आहेत. त्या मार्गी लावण्याचा प्रयत्नदेखील करण्यात येत असून, युवासेनेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. नवी मुंबई युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेला हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर राबवणार असल्याचे ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
नवी मुंबई युवासेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईतील गोठवली गावातील नागरिकांचा सन्मान, विविध मंडळांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप, तसेच कार्यकर्त्यांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नरेश म्हस्के बोलत होते. नवी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी युवासेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. युवासेना ही केवळ तरुणांची संघटना नाही, ती आज नवी मुंबईतील जनतेच्या हक्कांसाठी झगडणारी ताकद बनली आहे. जनतेला न्याय मिळवून देणे, विकासाची कामे मार्गी लावणे आणि शिवसेनेचे कार्य घराघरांत पोहोचवणे हे उद्दिष्ट युवासेनाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे पूर्ण केले जात आहे. संपूर्ण बेलापूर आणि ऐरोली विधानसभेमध्ये युवासेनेच्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे, त्यामध्ये कार्यकर्त्यांची निष्ठा, जिद्द आणि जनसेवेचे भान प्रकर्षाने दिसून येते. असे म्हस्के म्हणाले.
----------------
शिवसेनेवरील टीका खपवून घेणार नाही
नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे म्हणाले, विरोधकांनी शिवसेनेवर केलेली टीका खपवून घेणार नाही. ज्यांनी नवी मुंबईची सत्ता उपभोगलेली आहे, त्यांनी नवी मुंबईसाठी काय केले आहे हे समजेल, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. नवी मुंबईतील पाणी चोरले, औषध चोरले असे बोलतात. मग त्यांनी गुन्हे का दाखल केले नाहीत? स्वतःच अपयश लपविण्यासाठी दुसऱ्यावर खापर फोडण्याचे काम करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.