कारिया प्री-स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय मातीदिन

कारिया प्री-स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय मातीदिन

Published on

कारिया प्री-स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय मातीदिन
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : आर. बी. कारिया इंग्लिश प्री-स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय मातीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मातीशी स्नेह जपत रोपांची लागवड केली. या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये निसर्गप्रेम, जबाबदारी आणि संवेदनशीलता वाढवणे हा होता. या विशेष उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका दीपाली राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मातीच्या महत्त्वाबद्दल माहिती दिली. बालवर्गातील मुलांनी आपल्या छोट्या छोट्या हातांनी माती उकरून, त्यात रोपटे लावत आनंद व्यक्त केला. मातीचा सुगंध, स्पर्श यामुळे मुलांचे नैसर्गिक जगाशी नाते अधिक दृढ झाले. या क्रियेतून त्यांनी रोपांचे महत्त्व, त्यांची काळजी कशी घ्यायची हे शिकले. मुख्याध्यापिका राजपूत यांनी सांगितले की, “मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी निसर्गाशी जोडलेले उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा कृतीतून त्यांच्यात आत्मविश्वास, जबाबदारी आणि संवेदनशीलता निर्माण होते.” शाळेतील माती दिन हा फक्त आनंदाचा क्षण नव्हता, तर निसर्गाबद्दल प्रेम व काळजी शिकवणारा एक जीवनमूल्यांचा अनुभव होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com