ए के जोशी इंग्लिश मीडियम शाळा
विद्यार्थ्यांना मिळाले आपत्कालीन उपाययोजनांचे धडे
ठाणे ः येथील पीएमच्या सौ. ए. के. जोशी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत सोमवारी (ता. ३०) आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांचे सत्र इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. या सत्रात एफएसएआय यांच्यामार्फत संजय मिस्त्री आणि कृष्णकुमार चव्हाण या तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्कालीन स्थितीमध्ये स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे, यासाठी कुठल्या पद्धती वापरण्यात याव्यात, अशा वेळेस घाबरून न जाता त्या परिस्थितीला कसे सामोरे जावे, याबाबत मुलांना सहज कळतील, अशी उदाहरणं देऊन मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांकडून काही प्रात्यक्षिकेही करून घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.