घणसोलीत साकारणार खुला रंगमंच

घणसोलीत साकारणार खुला रंगमंच

Published on

तुर्भे, ता. २ (बातमीदार) : घणसोली येथे आरक्षित ठेवण्यात आलेल्या भूखंडावर पालिकेच्या माध्यमातून लवकरच खुला रंगमंच अकादमी साकारण्यात येणार आहे. याबाबत वनमंत्री तथा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी या रंगमंच अकादमीचा विषय थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेल्याने यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार पालिका स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
घणसोली सेक्टर-८ येथील गुणाली तलावाच्या शेजारी सिडकोकडून १५ वर्षांपूर्वी पालिकेकडे हस्तांतरित झालेला भूखंड तमाशा थिएटर या नावाने आरक्षण होता, परंतु येथे रंगमंच बांधला जात नव्हता. पालिकेकडून दरवर्षी आर्थिक वर्षात रंगमंच बांधण्यासंदर्भात चर्चा केली जात होती; परंतु रंगमंचाच्या बांधणीसंबंधी कोणतीही कार्यवाही केली जात नव्हती. अखेर वनमंत्री गणेश नाईक यांनी १९ जूनला मुख्यमंत्र्यांची भेट घेत रंगमंचाच्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईत लवकरच हक्काचे पहिला कला मंच उभा राहणार आहे. या रंगमंचामध्ये सांस्कृतिक, वाढदिवस साजरे करण्यासाठी खास जागा ठेवण्यात येणार आहे. रंगमंचासंबंधीचा प्रस्ताव सरकारी मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. प्रस्तवाला मंजुरी मिळताच कामाच्या निविदा काढल्या जातील. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे उपअभियंता रमेश गुरव यांनी दिली.
---------------
डेब्रिज, अतिक्रमण हटवण्याचे आव्हान
नवी मुंबईत सध्या वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृह आहे. दुसरे नाट्यगृह ऐरोली येथे तयार केले जात आहे. ज्या वेळी रंगमंचासाठी भूखंड आरक्षित ठेवला गेला, त्या वेळी ‘तमाशा थिएटर’ हे नाव देण्यात आले होते; परंतु आता या थिएटरचे नाव खुला रंगमंच अकादमी नावाने प्रसिद्ध झाले आहे. त्यातच या राखीव भूखंडावर डेब्रिज टाकण्यात आला आहे. डेब्रिजचे डोंगर हटवणेदेखील आव्हान असणार आहे. शिवाय या ठिकाणी झालेले अतिक्रमणदेखील काढून टाकणे महापालिकेला आव्हान ठरणार आहे.
--------------
असा असेल रंगमंच
भूखंड - ३,३०० चौरस फूट
इमारत - तळमजला अधिक तीन माळे
खर्च - २५ ते २६ कोटी अपेक्षित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com