मोखाडा आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवारीसाठी निवड

मोखाडा आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवारीसाठी निवड

Published on

मोखाडा (बातमीदार) : मोखाडा येथील वीर तिलका मांजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) वेगवेगळ्या व्यवसायाच्या ६० प्रशिक्षणार्थ्यांची नाशिक येथील बॉश कंपनीत शिकाऊ उमेदवारीसाठी निवड करण्यात आली आहे. या कंपनीचे प्रशिक्षण आणि विकास व्यवस्थापक अनंत दांडेकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. फिटर व्यवसायाचे १७, इलेक्ट्रिशियन व्यवसायाचे २० आणि मोटार मेकॅनिक व्यवसायाचे २३ प्रशिक्षणार्थ्यांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआयचे प्राचार्य रोहन चुंबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले. मोखाड्यासारख्या भागातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रथमच आंतरराष्ट्रीय कंपनीत शिकाऊ उमेदवारीची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. ही निवड प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी आयटीआयचे विजय खंदारे, साहेबराव धनवटे, राजेश हरळ, शशिराज बाविस्कर, प्रकाश मार्के यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com