पालघरमधील वीजपुरवठा लवकरच सुरळित

पालघरमधील वीजपुरवठा लवकरच सुरळित

Published on

पालघर, ता. २ (बातमीदार) : महिनाभर पाऊस सुरू झाल्यापासून ग्रामीण परिसरात महावितरणचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. परिणामी वाढवण, चिंचणी परिसरातील डायमेकर उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे. नवीन आणलेल्या मशीन पडून आहेत. वीजपुरवठा काही ठिकाणी दोन-तीन दिवस खंडित झालेला असतो, अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर सर्पदंशासारखे प्रकार घडत आहेत, अशा अनेक तक्रारी आमदार राजेंद्र गावित यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित नागरिकांनी केल्या.

आमदार राजेंद्र गावित यांच्याकडे पालघर जिल्ह्यातील सातपाटी, तारापूर, चिंचणी, वाढवण, धाकटी डहाणू व कासा व इतर ग्रामीण गाव-पाड्यांतील नागरिकांनी महावितरणचा वीजपुरवठा अनियमित होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून आमदार गावित यांनी पालघर विभागातील महावितरण कंपनीच्या अधिकारी व वीजपुरवठा होणाऱ्या संबंधित गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व नागरिक यांची संयुक्त बैठक सोमवारी (ता. ३०) जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केली होती.

मेमध्ये पाऊस सुरू झाल्याने देखभाल-दुरुस्तीची कामे मागे पडली. झाडांची छाटणी न झाल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. काही ठिकाणी विद्युत जनित्र कमी पडतात. त्यामुळे भार वाढल्यामुळे पुरवठा खंडित होतो. येत्या दोन आठवड्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत होईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असे महावितरणच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

पाच हजार कोटींची तरतूद
पश्चिम किनारपट्टीमध्ये भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्यासाठी राज्य सरकारने पाच हजार कोटींची तरतूद केली आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू असून, येत्या काही दिवसांत पालघर तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीमधील वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल, तसेच मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी ५० कोटींची तरतूद केली आहे. येत्या काही दिवसांत ही रक्कम महावितरणकडे जमा झाल्यानंतर ग्रामीण भागातील जनित्र, वीज खांब व साहित्याची तरतूद होणार आहे, असे गावित यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com