कामचुकार कर्मचारी व डॉक्टरांवर कारवाई करा!
‘पालिकेच्या रुग्णालयातील कामचुकार डॉक्टरांवर कारवाई करा’
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची आयुक्तांकडे मागणी
कळवा, ता. २ (बातमीदार) ः मुंब्र्यातील कौसा येथे ठाणे महापालिकेकडून स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालय सुरू करण्यात आले आहे, मात्र या रुग्णालयात रुग्णांना सुविधांपासून सध्या वंचित राहावे लागत आहे. परिणामी, रुग्णांना थेट कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय किंवा ठाण्यातील सिव्हील रुग्णालय गाठावे लागत आहे. ही बाब गंभीर असून, रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या रुग्णालय प्रशासन, कर्मचारी व डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा-मुंब्रा अध्यक्ष शमीम खान यांनी केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शमीम खान यांनी मंगळवारी (ता. १) ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेऊन ही मागणी केली. याप्रसंगी शमीम खान म्हणाले की, या रुग्णालयात अनेकदा अपघातग्रस्त रुग्ण येत असतात, मात्र येथे पोलिस चौकी नसल्याने अपघातग्रस्तांना दाखलच करता येत नाही. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी गायब तर असतातच शिवाय औषधांचा साठाही अपुरा असतो. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने निवासी डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असतात. बालरोगतज्ज्ञ तर नेहमीच गायब असतात. या रुग्णालयाचे प्रशासनही मुजोर असल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी खान यांनी आयुक्तांकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.