महात्मा फुले महाविद्यालयासमोरील सेवारस्ता धोकादायक

महात्मा फुले महाविद्यालयासमोरील सेवारस्ता धोकादायक

Published on

महात्मा फुले महाविद्यालयासमोरील सेवा रस्ता धोकादायक
कामोठे, ता. २ (बातमीदार) : महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या समोरील उड्डाणपुलाखालील सेवा रस्‍त्‍यावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. चिंचपाडा येथील जनहित सामाजिक संस्थेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व्यवस्थापकांना अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी निवेदन दिले आहे.
महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासमोरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखालील सेवा रस्‍त्‍यावरून दररोज मोठ्या संख्येने जड व अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. करंजाडे नोड, वडघर नोड आणि चिंचपाडा परिसरातील नागरिक याच मार्गाने प्रवास करतात. महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या उड्डाणपुलाखाली दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. या पाण्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सेवामार्गाच्या दोन्ही बाजूंनी जड-अवजड वाहनांची भरधाव वाहतूक सुरू असते. शिवाय या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने भरधाव वाहनांमुळे अपघाताची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍यामुळे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जनहित सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com