खोणीच्या सरपंचपदी हनुमान ठोंबरे
खोणीच्या प्रभारी सरपंचपदी हनुमान ठोंबरे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : खोणी ग्रामपंचायतीत प्रभारी सरपंच म्हणून हनुमान ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे. खोणीच्या सरपंच उज्ज्वला काळोखे यांनी एका महिन्यांसाठी रजेचा अर्ज गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. यामुळे बुधवारी झालेल्या ग्रामसभेत सदस्य ठोंबरे यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दिलीप जागरे यांनी ठोंबरे यांची निवड झाल्याचे माध्यमांना सांगितले. प्रभारी सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर ठोंबरे समर्थकांनी ग्रामपंचायत परिसरात जल्लोष केल्याचे चित्र दिसून आले. या वेळी कल्याण पंचायत समितीचे उपसभापती भरत भोईर यांसह मोठ्या संख्येने युतीचे कार्यकर्ते एकत्रित आले होते. हनुमान ठोंबरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे संघटनेकडून अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.