लाचखोर महसूल सहाय्यकासह एकाला अटक

लाचखोर महसूल सहाय्यकासह एकाला अटक

Published on

लाचखोर महसूल सहाय्यकासह एकाला अटक

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल सहाय्यकासह एकाला २० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. कर्ज थकल्यामुळे मालमत्ता जप्त करण्याची कारवाई न करण्यासाठी अतिरिक्त तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्याची बाब यामध्ये उघडकीस आली आहे.
मिरा-भाईंदरमध्ये राहणाऱ्या एकाने घरासाठी बँकेतून कर्ज घेतले होते; मात्र हे कर्ज थकल्याने बँकेने कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेल्या घराचा ताबा मिळावा यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानुसार हे प्रकरण मिरा-भाईंदरच्या अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाकडे सोपविण्यात आले. अतिरिक्त तहसिलदारांनी या व्यक्तीला १५ दिवसांत घर रिकामे करण्याची नोटीस बजावली. दरम्यान या कारवाईविरोधात त्या व्यक्तीने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला. या दाव्यासाठी हवी असलेल्या नोटिसीसंबंधीची कागदपत्रे घेण्यासाठी ही व्यक्ती अतिरिक्त तहसीलदार कार्यालयात गेली होती. त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या विनोद इंदुलकर या खासगी व्यक्तीने संबंधित कागदपत्रे देण्यासाठी तसेच घरावरील जप्तीची कारवाई सप्टेंबरपर्यंत न करण्यासाठी अतिरिक्त तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक श्याम बोडेकर याच्याकरिता ६० हजार रुपयांची मागणी केली. यापैकी ४० हजार रुपयांची रक्कम इंदुलकर याने बोडेकर याच्यासाठी वेळोवेळी स्वीकारली. उरलेले २० हजार रुपये देण्याची मागणी इंदुलकर करत होता.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत कार्यालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली. या विभागाने केलेल्या पडताळणीत इंदुलकर याने बोडेकर याच्यासाठी ४० हजार रुपये स्वीकारले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी (ता. १) सायंकाळी या विभागाने सापळा रचून इंदुलकर याला महसूल सहाय्यक श्याम बोडेकर याच्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या वेळी महसूल सहाय्यक श्याम बोडेकर यालाही ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com