आरटीई विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित

आरटीई विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित

Published on

आरटीई विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित
शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : आरटीई अंतर्गत शाळा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देणे बंधनकारक आहे. परंतु, खासगी शाळा प्रशासनाकडून शैक्षणिक साहित्य दिले जात नाही. शैक्षणिक साहित्यापासून वंचित ठेवल्यामुळे संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाणे पालिकेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सध्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी मागील चार महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. ठाणे जिल्ह्यात ६२७ शाळेतून ११ हजार ३२२ जागांवर आरटीई प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रवेश प्रक्रियेला जानेवारीपासून सुरुवात झाली. त्यानुसार जिल्ह्यातून २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील शाळा प्रवेश घेणाऱ्या आरटीई विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक खासगी शाळा प्रशासनाकडून गणवेश, वह्या पुस्तके व शैक्षणिक साहित्य आदी सुविधा देत नसल्याने पालकांनी विद्यार्थ्यांसह ठाणे पालिकेच्या शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com