म्हाडाकडून पूर्व उपनगरात १० ओपन जिमची उभारणी

म्हाडाकडून पूर्व उपनगरात १० ओपन जिमची उभारणी

Published on

पूर्व उपनगरांत १० खुल्या व्यायामशाळांची उभारणी
म्हाडाकडून आणखी १५ उभारण्याचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : झोपडपट्टीतील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना सहजपणे व्यायामाचे साहित्य उपलब्ध व्हावे, चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाने कंबर कसली आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून पूर्व उपनगरांत वेगवगेळ्या १० उद्यानांमध्ये खुल्या व्यायामशाळा उभारल्या आहेत. तसेच आणखी १५ व्यायमशाळा उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना दिलासा मिळत आहे.
झोपडपट्टी परिसरात मैदाने कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने व्यायाम कुठे करावा, असा प्रश्न नागरिकांसमोर असतो. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे सामान्य कुटुंबातील लोकांना आपले आरोग्य जपता यावे, दररोज नियमित व्यायाम करता यावा म्हणून म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून टिळकनगर येथील लोकमान्य टिळक क्रीडांगण, श्री गणेश उद्यान, नाना-नानी पार्क, चेंबूरमध्ये सदगुरू स्वामी जयरमदास उद्यान, स्वातंत्र्यसैनिक उद्यान, नारायण गजानन आचार्य उद्यान, मुलुंड येथील छत्रपती संभाजी राजे मैदान, सरदार प्रतापसिंह मनोरंजन उद्यान अशा वेगवगेळ्या १० ठिकाणी सर्वसमावेशक खुल्या व्यायामशाळा उभारल्या असून, त्याचा रहिवाशांकडून वापर केला जात आहे. त्यामुळे रहिवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com