उंबर्डे कचरा प्रकल्पात साठा पडून

उंबर्डे कचरा प्रकल्पात साठा पडून

Published on

मुदतबाह्य औषधांचा उंबर्डे कचरा प्रकल्पात साठा
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : कोरोना काळात मागवलेली महागडी औषधे आता मुदतबाह्य ठरली आहेत. त्यामुळे या औषधांच्या साठ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली-महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार ही औषधे उंबर्डे येथील वैद्यकीय कचरा प्रकल्पात रवाना केली; मात्र आता आठ दिवस उलटत आले तरीही कोरोना काळातील या औषधांची विल्हेवाट लागलेली नाही. त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक शुक्ला यांनी घेतली असून, संबंधितांना लेखी खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

उंबर्डे बायो मेडिकल वेस्ट प्लॉन्टमध्ये कोरोना रुग्णावर उपाचासाठी मागविलेल्या औषधापैकी मुदतबाह्य झालेला साठा आठ दिवसांपासून पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. या औषधावर बायो मेडिकल वेस्ट प्रक्रिया करण्यात आलेली नाही.

कोरोना काळात अनेक प्रकरची कोट्यवधीची औषधे मागविण्यात आली होती. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सेंटर स्टोरमध्ये वापरात न आलेल्या औषधांपैकी मुदतबाह्य झालेला औषधसाठा योग्य ती विल्हेवाट प्रक्रियेसाठी बायो मेडिकल प्लॉन्टमध्ये पाठविला होता, परंतु ही औषधे आठ दिवसांपासून पडून असल्याने प्रभारी वैघकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे उंबर्डे बायो मेडिकल वेस्ट प्रकल्पातील कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुदतबाह्य झालेला औषधसाठा बायो मेडिकल वेस्ट प्लॉन्टमध्ये पाठविताना वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात येणे गरजेचे होते. यासंदर्भात संबंधितांवर कारणे दाखवा नोटीस बाजवल्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com