शिधापत्रिकेसाठी तीन दिवसांचा शिबिर
शिधापत्रिकेसाठी तीन दिवसांचा शिबिर
जोगेश्वरी, ता. ३ (बातमीदार) ः शिधावाटप कार्यालय २६-ड, अंधेरी पूर्व अंतर्गत अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी-पूर्व विभागातील पात्र नागरिकांच्या शिधापत्रिकांसाठी तीन दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान आरोग्य कार्ड देणे, शिधापत्रिकेमधील सदस्यांचे सत्यापन करणे, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सदस्य इष्ठांकपूर्ती करण्यात येणार आहे. संबंधित नागरिकांनी रास्त भाव दुकान क्रमांक २६- ड-२२८, जननी देवी स्टोअर्स, हरिहरसिंग चाळ, गुंफा रोड, जोगेश्वरी पूर्व येथे रविवार (ता. ६) ते मंगळवार (ता. ८) दरम्यान असे तीन दिवस सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भव्य शिबिर तथा जनता दरबाराचे आयोजन केले आहे, पात्र रहिवाशांनी कुटुंबातील सदस्यांसह उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिधावाटप अधिकारी व परिमंडळ विभागाचे अतिरिक्त कार्यभार असलेल्या अधिकारी अश्विन रोहिणीकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.