पान ६ अवतीभवती
जगन्नाथ घोलप यांचा सेवानिवृत्ती सोहळा
टोकावडे (बातमीदार) ः मुरबाड तालुक्यातील जनसेवा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धसई येथे लिपिक पदावर कार्यरत असलेले जगन्नाथ पांडुरंग घोलप सोमवारी (ता. ३०) सेवानिवृत्त झाले. त्यांनी ३५ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात कार्यकुशलतेची छाप सोडली.
जगन्नाथ घोलप हे काटेकोरपणा, नम्रता आणि मनमिळाऊपणासाठी परिचित होते. विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांच्याच मनात त्यांनी मानाचे स्थान मिळवले. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना यांच्यातर्फे घोलप यांना ‘आदर्श लिपिक’ हा सन्मान दिला होता. तसेच त्यांना कोकण विभाग पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य प्रमोद घोलप, धसई ग्रामपंचायत सरपंच दत्तात्रय मेंगाळ, माजी सरपंच दुंदाजी सुरोशे, नितीन घोलप, माजी उपसरपंच अभिजत घोलप, केंद्रप्रमुख राजाराम घुडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
---------
कृषी दिंडीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती
मुरबाड (बातमीदार) : तालुक्यातील सरळगाव येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषिदिनानिमित्त संगमगावमध्ये कृषी दिंडी काढली. यामार्फत शेतकऱ्यांना कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून शेतीविषयक अनुभव जाणून घेतले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न यशोदीप सामाजिक विकास संस्था संचालित कृषी महाविद्यालय, सरळगाव येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मृदगंध या गटातील कन्या व दूतांनी संगमगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहाय्याने कृषी दिंडी काढली. या दिंडीमधून शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली व अनेक शेतकऱ्यांकडून शेतीविषयक अनुभव जाणून घेतले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. सी. सरोदे, गट मार्गदर्शक प्रा. डी. एल. पाटील व सामाजिक कार्यकर्ते केतन यशवंतराव आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी
मुरबाड ः कृषी दिंडी काढून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.
----------------
श्री माहेश्वरी महिला समितीची कार्यकारिणी घोषित
भिवंडी (वार्ताहर) ः शहरात उद्योग-व्यवसायानिमित्त मोठ्या संख्येने राजस्थान येथील माहेश्वरी समाज वास्तव्यास असून, या समाजातील महिलांना संघटित करणाऱ्या श्री माहेश्वरी महिला समितीच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
श्री माहेश्वरी मंडळ, भिवंडीचे अध्यक्ष ओमप्रकाश भूतडा, सचिव कन्हैयालाल पेडीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शशी मोहता, पुष्पा बलदेवा व मंगला सोमानी यांच्या व्यवस्थापनाखाली वार्षिक सर्वसाधारण सभेत तीन वर्षांसाठी महिला मंडळ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यामध्ये महिला मंडळाच्या अध्यक्षपदी बबिता द्वारकाप्रसाद असावा, उपाध्यक्ष सुनीता राठी, सचिव सीमा जागेटिया,
सहसचिव उज्ज्वला सारडा, खजिनदार सरोज पेडीवाल, सांस्कृतिक मंत्री सीमा झंवर, संघटन मंत्री संगीता बिहानी व कार्यकारिणी सदस्यपदी रेखा असावा, प्रीती लाहोटी, संगीता गट्टाणी, तरुणा कांकाणी, शिल्पा असावा, बिंदू सोनी, नीता सारडा, सुधा सारडा, निर्मला झंवर, सुमन लोहिया, सरिता मुंदडा, सीमा जाखोटिया, नीला भूतडा, रेखा लोहिया, तनुजा गगड, सरोज बजाज, कीर्ती बिर्ला, सरिता बजाज यांचा समावेश आहे. महिला मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन पुढील काळात करण्यात येणार असल्याचे सांगत नवनिर्वाचित अध्यक्षा बबिता द्वारकाप्रसाद असावा यांनी सर्व महिला सभासदांचे आभार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.