डोंबिवलीत मंगळवारी जनता दरबार

डोंबिवलीत मंगळवारी जनता दरबार

Published on

डोंबिवलीत मंगळवारी जनता दरबार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी समजून घेणे आणि त्यांचे जलद गतीने निराकरण व्हावे, यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी पालिका मुख्यालयात जनता दरबार भरविण्यात येतो. जुलै महिन्यात ८ जुलैला डोंबिवलीत महापालिकेच्या उपविभागीय कार्यालयात हा जनता दरबार दुपारी तीन ते पाच या वेळेत भरणार आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या पालिकेशी संबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी पालिका आयुक्तांच्या दालनात अभ्यांगतासाठी जनता दरबार आयोजित करण्यात येतो. या महिन्यातील जनता दरबार डोंबिवलीतील फ प्रभाग क्षेत्र कार्यालय, पी.पी.चेंबर इमारत, पहिला मजला, डोंबिवली (पू.) येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com