गावठी दारूचा अड्डा उध्वस्त
गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : शहराच्या कॅम्प ४ परिसरातील मानेरे गावात गावठी दारू तयार केली जात होती, याचा पर्दाफाश विठ्ठलवाडी पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी गावात छापा टाकत तब्बल सव्वा लाख रुपयांचा अवैध रसायनसाठा नष्ट केला.
उल्हासनगर कॅम्प ४ येथील मानेरे गावात गावठी हातभट्टीच्या दारूचा मोठा अड्डा कार्यरत असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तत्काळ कारवाई करीत संपूर्ण ठिकाणी छापा टाकला. कृष्णा भोईर आणि लक्ष्मण जेसवाणी या दोघांनी मिळून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध रसायनांचा साठा करून ठेवला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांना एका गोलाकार लोखंडी टाकीत २,५०० लिटर रसायन (वॉश), एका आयताकृती लोखंडी टाकीत २,००० लिटर रसायन तसेच एका प्लॅस्टिकच्या टाकीत १,२०० लिटर गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन सापडले. याशिवाय २०० लिटर क्षमतेचे सहा ड्रमही पोलिसांनी ताब्यात घेतले. एकूण रसायन व साहित्याची अंदाजित किंमत एक लाख १५ हजार २० रुपये आहे. पोलिसांनी संपूर्ण रसायन नष्ट केले असून, आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.