चिपळे गावातील रस्त्यावर खड्डे
नवीन पनवेल, ता. ३ (बातमीदार) : नवीन पनवेल परिसरातील चिपळे गावात दोन रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता भीती व्यक्त होत आहे. त्या रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. चिपळे गावात प्रवेश करताना रस्ता एका बाजूने सिमेंटचा; तर दुसऱ्या बाजूने डांबरीकरणाचा बनवण्यात आला आहे. दोन रस्त्यांच्या मध्ये असलेला भाग भरला नसल्याने पावसाच्या पाण्याने त्या ठिकाणी खड्डे बनत चालले आहेत. नेहमीच्या वाहनधारकांना सवय असली तरी नवीन लोकांना खड्डे लक्षात येत नाहीत. त्यामुळे दररोज दोन ते तीन दुचाकी घसरून वाहनधारक जखमी होत आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने डांबरी रस्ताही खचत चालला आहे. याप्रकरणी प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन खड्ड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी सचिन कापसे यांच्यासह अन्य वाहनचालकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.